‘प्र’च्या कविता

Showing posts with label ती मी आणि इतर सारे. Show all posts
Showing posts with label ती मी आणि इतर सारे. Show all posts

Thursday, 30 December 2010

ती मी आणि

पावसात ती

तिच्यात पाउस

दोन्हीत मी

चिम्ब भिजलेला ।

मनात ती

तिच्यात मन

दोन्हीत मी

पूर्ण हरवलेला ।

आयुष्यात ती

तिच्यात आयुष्य

दोन्हीत मी

सदा रमलेला ।

सार्यात ती

तिच्यात सारे

दोन्हीत मी

अंतर्बाह्य रंगलेला .