‘प्र’च्या कविता

Friday 31 December 2010

तू जीव माझा

तू


तू स्वप्नांच्या स्वप्नी

तू गीत स्वरांच्या ओठी

रेघ तुझ्या सौंदर्याची

आहे नजरेहून मोठी

तू


तू मौनांचा सांगावा

तू खिन्नतेचा सल

तुझ्या रूपेरी डोळ्यात

तेज तमाचे तरल

तू


तू आस आसवांची

तू आभासांचा भास

सावलीस हवाहावासा
तुझा धुंद सहवास


तू

तू ध्यास अशाश्वताचा

तू श्वासांचा जीव

नसानसांत भिणली माझ्या

तुझी तप्त जाणीव

Thursday 30 December 2010

ती मी आणि

पावसात ती

तिच्यात पाउस

दोन्हीत मी

चिम्ब भिजलेला ।

मनात ती

तिच्यात मन

दोन्हीत मी

पूर्ण हरवलेला ।

आयुष्यात ती

तिच्यात आयुष्य

दोन्हीत मी

सदा रमलेला ।

सार्यात ती

तिच्यात सारे

दोन्हीत मी

अंतर्बाह्य रंगलेला .

shabdangan

नमस्कार मित्रांनो नमस्कार

आज पासून मी हा नविन ब्लॉग सुरु करतोय जो फ़क्त माझ्या कवितांचा असणार आहे।

ही माझी गरज आहे जगण्याची , स्वताचा शोध घेण्याची, आणि यात जे अनुभव येतील ते तुमच्याशी

वाटुन घेण्याची .